ज्या दिवशी सगळ्या शेतकर्‍यांना कायदा कळेल, त्या दिवशी सारा देश पेटून उठेल – राहुल गांधी

देशातील सगळ्या शेतकर्‍यांना नव्या कृषी कायद्याबद्दल फार माहित नाही, परंतु ज्या दिवशी सगळ्या शेतकर्‍यांना हा कायदा कळेल तेव्हा सारा देश पेटून उठेल असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच हे कायदे तत्काळ मागे घ्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. राहुल गांधी आपल्या मतदारसंघ केरळमधील वायनाडमध्ये बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले की, हिंदुस्थानच्या शेतकर्‍यांवर हल्ला होत आहे असे आमच्या लक्षात आले. ही गोष्ट भट्टा पारसौल मध्ये सुरू झाली. तिथे शेतकर्‍यांच्या जमिनी लुबाडल्या जात होता. याबाबत काँग्रेस पक्षात चर्चा सुरू झाली. त्यासाठी आम्ही जुना ब्रिटिशांच्या काळातील कायदा काढून टाकला आणि नवीन भुमी अधिग्रहण कायदा आणला. या कायद्यात शेतकर्‍यांना जमिनीची योग्य मोबदला आणि जमिनीची सुरक्षेचे आश्वासन दिले. पण जेव्हा मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी हा कायदा मारण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्याविरोधात लढा दिला आणि त्यांना यापासून रोखले. जेव्हा केंद्रीय स्तरावर मोदी अपयशी झाले तेव्हा त्यांनी भाजप शासित हा कायदा रद्दबातल करण्याचे आदेश दिले असेही गांधी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या