विरोधी पक्षाच्या नेत्यांसह राहुल गांधीच्या कश्मीर दौऱ्याला प्रशासनाचा रेड सिग्नल

520
rahul_gandhi

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसह शनिवारी कश्मीरचा दौरा करणार आहेत. जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल यांचा हा पहिलाच कश्मीर दौरा आहे. या दौऱ्यात राहुल जम्मू कश्मीरच्या स्थितीचा आढावा घेणार असून नागरिकांशीही चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात राहुल यांच्यासोबत गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सीपीआयचे नेते डी. राजा, सीपीएमचे नेते सीताराम येचुरी आणि आरजेडीचे मनोज झा असतील. मात्र, विरोधी पक्षांनी कश्मीरचा दौरा करू नये, असे जम्मू कश्मीर प्रशासनाने म्हटले आहे. राज्यातील शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राहुल गांधी यांनी जम्मू कश्मीरच्या स्थितीवर भाष्य केल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी त्यांना कश्मीर भेटीचे आमंत्रण दिले होते. राज्यातील परिस्थिती समजून घेऊन भाष्य करण्याचा सल्ला राज्यपालांनी राहुल यांना दिला होता. मात्र, विरोधी पक्षाच्या नेत्यांसह कश्मीर भेटीला परवानगी द्यावी, सामान्य जनतेशी आणि सुरक्षा दलातील जवानांशी संवाद साधण्याची परवानगी त्यांनी राज्यपालांकडे केली होती. मात्र, राज्यपालांनी ती मागणी अमान्य केली होती. त्यानंतर आता शनिवारी राहुल गांधी जम्मू कश्मीरचा दौरा करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या