काँग्रेसला आणखी एक धक्का, विजय पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

3293
vijay-patil-vasai

काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आज अनंत चतुर्दशीच्या मूहुर्तावर वसई काँग्रेसचे विजय पाटील यांनी काँग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ येथे पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विजय पाटील यांना शिवबंधन बांधून शुभेच्छा दिल्या. विजय पाटील यांच्या त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.

आपली प्रतिक्रिया द्या