तुम्ही मंत्री होता, कुठे चुकलात हे तुम्ही पाहायला हवे! राजीव सातव यांचा वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना सल्ला

3083

2019 च्या लोकसभा निवडणुकीला वर्ष झालं तरी काँग्रेस अजून उर्जितावस्थेत येताना दिसत नाहीये. मध्य प्रदेशात काँग्रेसने सत्ता गमावली असून राजस्थानमध्ये सत्ता टीकवण्यासाठी काँग्रेसला धडपड करावी लागत आहे. काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेते विरूद्ध तरुण नेते असा संघर्ष दिसायला लागला आहे. गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत या संघर्षाची एक झलक पाहायला मिळाली.

मोदींवर टीका करणे सोडा, काँग्रेसकडे लक्ष द्या! शरद पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान

इंडीयन एक्सप्रेसने एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या वृत्तामध्ये म्हटलं आहे की माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पराभवावर आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली. माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांनी या बैठकीत म्हटले की लोकांचा काँग्रेसकडून अपेक्षाभंग का झाला हे लोकांकडूनच जाणून घ्यावे लागेल. राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी या दोन नेत्यांनंतर बोलताना म्हटले की आत्मपरीक्षण स्वत:पासून सुरू करणं गरजेचं आहे. सातव म्हणाले की आपण 44 वर कसे पोहोचलो यावर विचार केला जाणं गरजेचं आहे. ते म्हणाले की ‘2009 मध्ये आपण 200 हून अधिक होतो. तुम्ही आत्मपरीक्षणाबाबत बोलत आहात, तुम्ही सगळे तेव्हा मंत्री होता. खरं सांगायचं तर तुम्ही कुठे चुकलात हे देखील पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला युपीए-2 पासून आत्मपरीक्षणाची सुरुवात करणं गरजेचं आहे’

मोदींनी अर्थव्यवस्था आणि रोजगाराचा सत्यानाश केला, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, ए.के.अँटोनी यासारखे वरिष्ठ नेतेही हजर होते. सातव यांनी केलेले विधान हे या वरिष्ठ नेत्यांविरोधात केलेला शाब्दीक हल्ला होता असं काही नेत्यांनी म्हटलं आहे. याच बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनवावे अशी पुन्हा मागणी करण्यात आली. दिग्विजय सिंह यांनी केलेल्या या मागणीला आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा आणि काँग्रेस सरचिटणीस शक्तीसिंह गोहील, नीरज डांगी यांनी पाठिंबा दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या