दिग्विजय सिंह शुक्रवादी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता

digvijaya-singh

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सिंह यांनी गुरुवारी काँग्रेस कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज घेतला. हा अर्ज ते उद्या म्हणजे शुक्रवारी दाखल करण्याची शक्यता आहे. सिंह यांनी एकूण 10 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. असं करून ते नेमका काय संदेश देऊ इच्छितात असा प्रश्न विचारला असता सिंह यांनी प्रतिप्रश्न केला की, तुम्ही ही बाब गांभीर्याने का घेत नाही ?

राजस्थानात अशोक गेहलोत यांच्या पवित्र्यामुळे ते बंडाचा झेंडा फडकावतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. काँग्रेसाध्यक्षपद मिळालं तरी आपण राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार नाही असे गेहलोत यांनी जाहीर केले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी एक व्यक्ती एक पद हा नियम असल्याचे सांगितल्यानंतर गेहलोत यांनी दवाब टाकणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ही बाब काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आवडली नव्हती. त्यांनी डोळे वटारताच गेहलोत यांनी आपली तलवा म्यान केली होती. या सगळ्या प्रकारामुळे त्यांची काँग्रेस अध्यक्ष होण्याची शक्यता मावळत चालली आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम 22 सप्टेंबरला जाहीर करण्यात आला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरला सुरू झाली. अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत ही 8 ऑक्टोबर असून 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. शशी थरूर हे देखील निवडणूक लढवणार असून ते देखील शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.