राज्यसभेचे सभापती विरोधी पक्षांना शत्रू प्रमाणे पाहतात, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचा आरोप

इंडिया आघाडीने राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पत्रकार परिषद घेतली. खरगे म्हणाले की, उपराष्ट्रपतीपद हे देशातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पद आहे. 1952 पासू कुठल्याही उपराष्ट्रीपतीविरोधात अविश्वास ठराव आणला गेला नव्हता. कारण आतापर्यंतचे सर्व उपराष्ट्रपती हे तटस्थ होते आणि नियमानप्रमाणे सदन चालवत होते. पण सध्या सदनात सर्व नियम सोडून फक्त राजकारण सुरू आहे.

गेल्या तीन वर्षांपासून धनखड यांचे कृती ही संविधानाविरोधात राहिली आहे. धनखड फक्त सरकारची प्रशंसा करतात, संसदेतसु्द्धा धनखड संघाची स्तुती करतात. विरोधी पक्षांकडे ते शत्रूप्रमाणे पाहतात, विरोधी पक्षांचा आवाज ते दाबतात. संसदेत कामकाज चालत नाही त्याचे कारण सभापती आहेत असेही खरगे म्हणाले.