…तर पंतप्रधान मोदींनी देशासोबत धोका केला, राहुल गांधींचा मोदींवर आरोप

65

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कश्मीरच्या मुद्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हिंदुस्थानात सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षात चांगलीच जुंपली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवनंतर काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीमाना दिलेले राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांनी केलेला दावा खरा असेल तर पंतप्रधान मोदींनी देशासोबत धोकेबाजी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे म्हणणे आहे की पंतप्रधान मोदी यांनी त्यांना कश्मीर प्रश्नी हिंदुस्थान आणि पाकिस्तानची मध्यस्थता करण्यास सांगितले आहे. हे खरे असले तर पंतप्रधान मोदींनी हिंदुस्थाचे हित आणि 1972 शिमला करारासोबत दगाबाजी केली आहे. या प्रकरणी दुर्बळ परराष्ट्र मंत्रालयाने केलेलं खंडन पुरेसे नाही. पंतप्रधानांनी ट्रम्प आणि त्यांच्यातील बैठकीत नक्की काय बोलणे झाले ते देशाला सांगितले पाहिजे’.

राहुल गांधी यांच्या या ट्वीटनंतर आता सत्ताधारी भाजपकडून काय उत्तर येते हे याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या