
काँग्रेस नेते राहुल गांधी हे एका अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी आढळल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यावरून सध्या देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी आज ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत त्यांना एक सवाल केला आहे.
भाजपा कह रही है, अडानी पर आक्रमण देश पर आक्रमण है।
उनके लिए देश अडानी है और अडानी देश है।
आखिर प्रधानमंत्री अडानी को बचाने में अपनी पूरी शक्ति क्यों लगा रहे हैं?!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 25, 2023
भाजप बोलतेय की अदानीवर हल्ला तो देशावर हल्ला. त्यांच्यासाठी अदानी देश आहे आणि देश अदानी आहे. पंतप्रधान अदानीला वाचवण्यासाठी त्यांची पूर्ण शक्ती का लावत आहेत? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत हा सवाल केला आहे.
संसदेत पुराव्यांसह अदानी आणि मोदींच्या नात्याबद्दल सविस्तर बोललो. दोघांमधील नातं नवीन नाहीत, जुनेच आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हापासूनचे हे नाते असून याचे सार्वजनिक पुरावेही आहेत. मी विमानातील फोटोही दाखवले. नरेंद्र मोदी आपल्या मित्रासोबत बसले आहेत. हाच प्रश्न मी विचारला. मी लोकसभा अध्यक्षांना याबाबत चिठ्ठीही लिहिली. पण पुढे काही झाले नाही, असे राहुल गांधी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.