राजस्थानमध्ये विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा फडकावला?

31

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राजस्थानमध्ये बहुमत मिळवले. राजस्थानमध्ये काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आहेत. या विजयानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयाच्या उन्मादात पाकिस्तानचा झेंडा फडकावला असा दावा करण्यात येत आहे.

हा व्हिडीओ पॉलिटिक्स सॉलिटिक्स नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला असून आता पर्यंत हा व्हिडीओ जवळपास सहा लाखांपेक्षा जास्त वेळा पाहण्यात आला असून 21 हजार पेक्षा जास्त लोकांनी शेअर केला आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, भाजपच्या पराभवानंतर राजस्थानमध्ये काँग्रेसने हिंदूंना मोठे बक्षिस दिले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, जागे व्हा. काँग्रेसच्या विजयी रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकावण्यात आला. लाज वाटते आम्हाला या रॅलीत हिंदूंना पाहून… लाज वाटूद्या तुम्हीच मतं दिली आहेत त्यांना, अशा प्रकारचे कॅप्शन देण्यात आलेले आहे.

काय आहे सत्य?
व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेला झेंडा पाकिस्तानचा नाही. अनेक मुस्लिम आपले वर्चस्व दर्शवण्यासाठी हिरवा झेंडा वापरतात आणि हा झेंडाही त्यापैकीच एक आहे. पाकिस्तानचा झेंडा संपूर्ण हिरवा नसून त्याच्या मागच्या बाजूला पांढऱ्या रंगाची एक पट्टी आहे आणि मध्यभागी चाँद-तारे. हिरवा भाग मुस्लिम बहुलदा दर्शवते तर पांढरी पट्टी अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधित्व करते. तर पांढऱ्या रंगाल्या चंद्राचा अर्थ विकास आणि ताऱ्याचा अर्थ प्रकाश आणि ज्ञान असा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या