महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस व मनसेच्य़ा वसई अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

3388

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये विविध पक्षातील नेत्यांचे इन्कमिंग सुरू आहे. गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विजय पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसई अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या