दोन्ही देशांचे संबंध बिघडतील, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानला सज्जड दम

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात सुनावण्यात आलेल्या फाशीवर पुढचं पाऊल उचलल्यास दोन्ही देशांचे संबंध बिघडतील, असा सज्जड दम हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भरला आहे. तसेच कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची सरकारची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानच्या रावळपिंडी न्यायालयाने हिंदुस्थानी नागरिक कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचे आरोप ठेवत फाशीचे शिक्षा सुनावली. सोमवारी सुनावण्यात आलेल्या या ‘नापाक’ निर्णयावर हिंदुस्थानने तीव्र संताप व्यक्त केला. देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत निवेदन सादर केले. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.

कुलभूषण यांनी काही चुकीचे केल्याचा कोणताही पुरावा नाही. पाकिस्तानने उचलेले हे पाऊल म्हणजे पूर्वनियोजित हत्येचा कट असल्याचे सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, तुम्ही सुप्रीम कोर्टासाठी चांगला वकील देण्याचं म्हणताय, ही खूप छोटी गोष्ट आहे. आम्ही तर त्यांना सोडवण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या