नीरव मोदीच्या गीतांजली इफ्रास्ट्रक्चरला दणका, ग्राहकांना 50 हजारांची भरपाईचे आदेश

474

पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 20 हजार कोटी रुपयांना फसविणारे व्यावसायिक मेहुल चोक्सी व नीरव मोदी हे संचालक असलेल्या गीतांजली इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. कंपनीविरुद्ध तक्रार करणार्‍या ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश जारी करण्यात आले आहेत.

कंपनीविरुद्ध प्रमोद टिक्कस, मयूर मोदी, रणजित अग्रवाल व गमनजितसिंग यांनी तक्रार दाखल केली होती. या ग्राहकांना सर्व सुविधांसह तीन महिन्यांत फ्लॅटस्चा ताबा देण्यात यावा, त्यांच्याकडून वेळोवेळी घेतलेल्या रकमेवर 10 टक्के व्याज अदा करण्यात यावे आणि तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी 50 हजार रुपये भरपाई देण्यात यावी असे आदेश आयोगाने कंपनीला दिले आहेत. तक्रारीतील माहितीनुसार ग्राहकांनी कंपनीच्या बोरिवली, मुंबई येथील योजनेतील थ्री-बीएचके फ्लॅटस् खरेदी केले आहेत. करारानुसार 31 डिसेंबर 2015 पर्यंत फ्लॅटस्चा ताबा देणे आवश्यक होत, परंतु कंपनीने कराराचा भंग केला. ही योजना अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. तसेच योजनेत फ्लॉवर बेड, पार्किंग, जिम्नॅशियम, एसटीपी, जलतरण तलाव, योगा रूम, स्पा रूम, बॅन्क्वेट हॉल, सीसीटीव्ही इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या