व्यवस्थित शिजवलेली अंडी व चिकन खाणे सुरक्षित, केंद्र सरकारचे आवाहन

देशभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर आता आलेल्या बर्ड फ्ल्यूने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षी मरत असल्याने तेथील सरकारांनी पोल्ट्री व्यवसायावर काही काळासाठी बंदी घालण्याचे निर्णय घेतले आहे. त्यांचा या निर्णयाचा राज्य सरकारांनी पुन्हा विचार करावा असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. ‘चिकन व अंडी योग्यरित्या शिजवून खाल्ले तर ते अगदी सुरक्षित आहे’, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

पशू पालन मंत्रालयाकडून एक पत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. ‘राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या बंदीमुळे पोल्ट्री व्यावसायिक व शेतकरी संकटात सापडले आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच पिचलेल्या या व्यावसायिकांवर दुहेरी संकट आल्यासारखे आहे. व्यवस्थित शिजवलेले चिकन व अंडी हे खाण्यासाठी सुरक्षित आहे. त्यामुळे लोकांनी या चुकीच्या अफवांवर बिलकूल लक्ष देऊ नये’, असे मंत्रालाकडून सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या