कसारा घाटात कंटेनरची एसटीला धडक

106

सामना ऑनलाईन, कसारा

नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल होऊन कंटेनरने मुंबईकडे जाणाऱया एसटी बसला धडक दिली. सुदैवाने या अपघातात बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. गुरूवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटातील नवीन वाडीलगत भरधाव वेगाने घाट उतरत असताना कंटेनरच्या (क्रमांक एमएच ४६ एच१६८९)  चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि कंटेनरने मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात एसटी बस डिवायडरला धडकली तर कंटेनर दरीत कोसळून दोघेजण जखमी झाले, मात्र एसटी बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात कंटेनरचालकावर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या