मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांचा करार वाढवला

7

सामना ऑनलाईन, मुंबई

१३ सामन्यांमध्ये पराभवाचा चेहरा पाहिलेला नाही… यापैकी नऊ सामन्यांमध्ये शानदार विजय व दोन ड्रॉ… तसेच फिफा रँकिंगमध्ये सर्वोत्तम ९६व्या स्थानावर झेप… हिंदुस्थानी फुटबॉल संघाच्या गरुडभरारीत सिंहाचा वाटा उचलणारे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांचा करार २०१९ एएफसी एशियन कपपर्यंत वाढवण्याचा निर्णय अखिल हिंदुस्थानी फुटबॉल फेडरेश्नच्या (एआयएफएफ) तांत्रिक समितीकडून बुधवारी घेण्यात आला आहे.

माजी फुटबॉलपटू शाम थापा यांच्या अधिपत्याखाली तांत्रिक समितीने स्टीफन कॉन्स्टंटाईन यांना थम्प अप दाखवला आहे. तांत्रिक समितीने आपला निर्णय जाहीर केला असून आता अंतिम निर्णय एआयएफएफ कार्यकारिणीकडून घेण्यात येणार आहे.

दृष्टिक्षेपात

तांत्रिक समितीने दोन महत्त्वाच्या कारणांमुळे स्टीफन कॉन्स्टंटाईन यांना प्रशिक्षकपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ सालातील एएफसी एशियन कपमध्ये हिंदुस्थानचा संघ पात्र ठरण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हिंदुस्थानला सातत्याने आशियातील सर्वोत्तम १ ५ संघांमध्ये स्थान मिळवता आले आहे.

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या