भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना लाच देताना ठेकेदारास अटक

21
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, भाईंदर

मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहनचा ठेका रद्द होऊ नये म्हणून भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांना २५ लाखांची लाच देताना ठेकेदार राधेश्याम कुतारिया याला आज ठाण्याच्या ऍण्टी करप्शन ब्युरोने अटक केली.

राधेशाम कुतारिया याच्या मेसर्स श्यामा श्याम सर्व्हिस सेंटर या कंपनीला पालिकेची परिवहन सेवा चालविण्याचा ठेका मिळाला होता. स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबतचा ठरावदेखील मंजूर झाला, मात्र भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचा त्यास विरोध होता. आपला ठेका जाऊ नये म्हणून राधेशाम कुतारिया याने आज मेहता यांना २५ लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला, मात्र ऍण्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी त्यास पकडले.

आपली प्रतिक्रिया द्या