पाणी पुरवठा योजनेचे काम मुदतीत पूर्ण न केल्यास ठेकेदारावर कारवाई

48

सामना ऑनलाईन, बीड

शहरात सुरु केलेल्या अमृत अटल पेयजल योजने अंतर्गत कामाची संथ गती असून एकून 19 भाग (झोन) मधील कामे संबंधित ठेकेदार कंपनीकडून मुदतीत होत नसल्याचे  दिसून आले आहे. यामुळे कामाचा दर्जा आणि गती राखली जात नसल्याने आणि बीड शहरातील अमृत अटल योजने अंतर्गत काम नागरीकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने संबंधितांनी गांभिर्याने करावे अन्यथा ठेकेदार कंपनीला काळया यादीत टाकण्याची कारवाई करु, असे निर्देश रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते बैठकीस नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे कार्यकारी अभियंता व्ही.आर.बढे, अभियंता ए.आर. मडावी, यासह मविप्र नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, संबंधित ठेकेदार, कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मंत्री महोदयांनी पाणी पुरवठा योजनेबरोबर भुयारी गटारी योजनेच्या कामाबाबत आढावा घेतला. शहरातील 16 रस्ते पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला असल्याने पायाभूत पाणीपुरवठा व भुयारी गटारीचे कामे झाले असल्यास रस्ते  पुन्हा खोदावे लागणार नाहीत, असे मंत्री क्षीरसागर यांनी सांगितले. या कामाच्या वेळी नागरिकांना होणाऱ्या असुविधेबाबत सुचनांचे फलक ग्लोसाईन देखील लावले जावेत, असे मंत्री क्षीरसागर म्हणाले.

यावेळी नगर परिषद अंतर्गत हे काम माजिप्रकडून केले जात आहे असे सांगितले. यातील बारचार्टनुसार  कामे होण्यासाठी  मजिप्र आणि संबंधित ठेकेदार कंपनीकडून मुदतीत झाल्या शिवाय रक्कम अदा करु नये, असे  क्षीरसागर म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय म्हणाले, सप्टेंबर 2018 आखेर कामाची जबाबदारी असून हे अत्यावश्यक काम असून कंपनी आणि माजिप्रच्या अधिकाऱ्यांनी हे काम न झाल्यास कायद्यानूसार कारवाई करु यासाठी विशेष पथक स्थापन करुन तपासणी करणार आहे,असे जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या