अफजल गुरू निर्दोष आहे म्हणणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

818

ईशान्येकडील राज्ये आणि आसामला हिंदुस्थानपासून तोडण्याची विखारी वक्तव्यं करणारा जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमाम याने केली होती. शाहीन बागमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात बोलतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असतानाच अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात असलेली तरुणी ही संसद हल्ल्याचा दोषी अफजल गुरू याला निर्दोष असल्याचं म्हणत आहे.

भाजपचे नेते संबित पात्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओही शाहीन बाग इथला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. संबित पात्रा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. आता त्या नापाक शरजील इमामनंतर आता या बाईंचं म्हणणंही ऐका. (ती म्हणते) ‘आम्हाला कोणावरही विश्वास नाही. या सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही. अफजल गुरू निर्दोष होता. रामजन्मभीवर मशीद उभारण्यात येणार होती’, असं ट्वीट पात्रा यांनी केलं आहे. या व्हिडीओवरही संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

दरम्यान, शरजील इमामने केलेली विखारी वक्तव्यं आणि शाहीन बाग आंदोलनाचा संबंध नसल्याचं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. आमचा कुणीही नेता नाही तसेच शरजीलशी आमचा काहीही संबंध नाही. शाहीन बाग येथील विरोधी आंदोलनासाठी कोणतीही समिती नाही. हे वादग्रस्त भाषण शाहीन बागमध्ये दिलं गेलेलं नाही. इथे महिला आंदोलन करत आहेत आणि शरजीलचा याच्याशी काहीही संबंध नाही, असं एक शाहीन बाग येथील आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या