नागपूरच्या तुरुंगातून जन्मठेपेचा कैदी पळाला

24

सामना ऑनलाईन । नागपूर

महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या नागपूरात दिवसाढवळ्या खूनाचे सत्र वरचेवर होत असते. याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या तुरुंगातील एका कैद्याने पलायन केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील गृहखात्याचे धिंडवडे निघाले आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या शमाल दिनेश सिस्वास या ४० वर्षाच्या या कैद्याने आज सोमवारी पलायन करून गृहखात्याला आव्हानच दिले आहे.

मुंबईतील शिवडी शहर सत्र न्यायालयाने सिस्वास याला खूनाच्या आरोपाबदद्ल दोषी ठरून जन्मठेपेची सजा १३-७-२००७ रोजी ठोठावली होती. कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहातून त्याला नागपूर येथील कारागृहात ३१ जानेवारी २०१६ रोजी दाखल केले होते. सिस्वास हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या