कोरल प्रत्यारोपण व कृत्रिम मत्स्य अधिवास, सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील दुसरा प्रकल्प

44

सामना ऑनलाईन, मालवण

तामीळनाडू राज्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर यूएनडीपीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कोरल प्रत्यारोपण व कृत्रिम मत्स्य अधिवास या प्रकल्प अभियानाची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली. मालवण किनारपट्टीवरील कवड़ा रॉक समुद्र परिसरात ३ ते ७ मीटर खोल पाण्यात सुमारे ५० ते १०० मीटर परिसरात हा प्रकल्प राबवला जाणार आहे, अशी माहिती यूएनडीपीचे उपजीविका सल्लागार सोहेल जमादार यांनी शुक्रवारी (२८) कवडा रॉक येथे बोलताना दिली.

यूएनडीपीच्या वतीने गेल्या वर्षी २०१६ मालवण दांडी किनाऱ्यावर प्रायोगिक तत्त्वावर जो पहिला प्रयोग राबवण्यात आला त्यावेळी २४० कृत्रिम मत्स्य अधिवास युनिट तर १२५ कोरल युनिट बसवण्यात आले. तो प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. आता कवडा रॉक समुद्र परिसरात १७६ मत्स्य अधिवास युनिट तर २०१ कोरल युनिट बसवण्यात आले आहेत. मत्स्य अधिवास निर्मिती बरोबर मत्स्यसाठे वाढ होणार आहे. तर समुद्री अन्न साखळी वाढण्यास मदत होणार आहे असे सांगण्यात आले.

दरम्यान, समुद्री कोरल, प्रवाळ व विविध मत्स्यसाठे वाढीच्या दृष्टीने तसेच पर्यटन क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे असेही जमादार यांनी सांगितले.

सिमेंट-काँक्रीटचे २ ते ३ फूट लांब व ३०० किलो वजनाचे ३ पीस एकत्र करून त्याचा त्रिकोण बनवत कृत्रिम मत्स्य अधिवास म्हणून तो समुद्रात सोडला जातो. तर सिमेंटच्या अर्धा फूट लांबीच्या लाद्यावर प्रवाळ प्रत्यारोपण करून ते समुद्रात सोडण्यात येतात अशी माहिती प्रत्यारोपण प्रक्रियेस उपस्थित तामीळनाडू येथील सुगंधी देवदासन मरीन रिसर्च इन्स्टिटय़ूटचे तज्ञ धिराबिया राज यांनी दिली.

यावेळी यूएनडीपीचे रोहित सावंत, बॉम्बे रिसर्च सोसायटीचे विशाल भावे तसेच अन्य तज्ञ टीम उपस्थित होती. यासह स्थानीक मच्छीमार नेते विकी तोरसकर, मोफत होडी व अन्य सेवा पुरावणारे चिवाला बिच वॉटर स्पोर्टचे सचिन गोवेकर, रोहित मेथर व अन्य सदस्य, सर्जेकोट येथील दादा सावजी, गंगाराम आडकर, बालू सावजी, नाना सावजी, संतोष शेलटकर, हरीश पराडकर, ध्रुवबाळ फोंडबा, गिरीश पेडणेकर, आबा सावंत यांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाल्याने चार दिवस चालणाऱया प्रकल्पाची सुरवात झाली असे जमादार यांनी सांगितले. तर प्रत्यारोपण करण्यात आलेल्या कोरल व कृत्रिम मत्स्य अधिवास प्रकल्पाची जबाबदारी मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक यांची राहणार आहे असेही सांगण्यात आले.

तीन तासांत कोरल प्रत्यारोपण अत्यावश्यक

समुद्रात विविध प्रकारच्या सजीव स्वरूपातील कोरल प्रजाती आहेत. कोरल तयार होण्यास पोषक वातावरण गरजेचे असते. कोरल वाढ वर्षाला मिलीमीटर स्वरूपात होते. म्हणून तिला संरक्षित दर्जा आहे. त्यामुळे नागपूर येथील प्रधान वनरक्षक यांची परवानगी घेत चिवला बीच रॉक गार्डन किनाऱ्यावरील टर्बीन कोरल काही भाग काढून त्याच पाण्यात ठेवून तीन तासाच्या आत त्याचे प्रत्यारोपण झाल्यास दोन महिन्यांनी त्याची वाढ सुरू होते.

जबाबदारी स्थानिकांची
प्रवाळ प्रत्यारोपण व कृत्रिम मत्स्य अधिवास प्रकल्प राबवल्यानंतर त्याला धोका न पोहचणे ही महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे प्रत्यारोपण केलेले क्षेत्र संरक्षित राहण्यासाठी जाळी अथवा बोया लावुन तो भाग किमान सहा महिने संरक्षित करने गरजेचे असल्याचे जमादार यांनी सांगितले.

यावेळी यूएनडीपीचे रोहित सावंत, बॉम्बे रिसर्च सोसायटीचे विशाल भावे तसेच अन्य तज्ञ टीम उपस्थित होती. यासह स्थानीक मच्छीमार नेते विकी तोरसकर, मोफत होडी व अन्य सेवा पुरावणारे चिवाला बिच वॉटर स्पोर्टचे सचिन गोवेकर, रोहित मेथर व अन्य सदस्य, सर्जेकोट येथील दादा सावजी, गंगाराम आडकर, बालू सावजी, नाना सावजी, संतोष शेलटकर, हरीश पराडकर, ध्रुवबाळ फोंडबा, गिरीश पेडणेकर, आबा सावंत यांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाल्याने चार दिवस चालणाऱया प्रकल्पाची सुरवात झाली असे जमादार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या