आनंदाची बातमी! देशात 10 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

460

अवघ्या देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा विळखा हिंदुस्थानलाही पडला आहे. देशातील आतापर्यंतची कोरोनाग्रस्तांची संख्या 16 लाखांवर पोहोचली आहे. मात्र, या 16 लाखांपैकी 10 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचं वृत्त आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील आतापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या 15 लाख 84 हजार इतकी झाली आहे. यातील 10 लाख 21 हजार रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 लाख 27 हजार इतकी असून 35 हजारांहून अधिक जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांमध्येही बहुतांश रुग्णांना अतिसौम्य ते सौम्य लक्षणे दिसत आहेत. अॅक्टिव्ह केसेसपैकी फक्त 10 टक्के रुग्ण हे गंभीर स्थितीत आहेत.

कोरोनाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या 4 लाखांवर गेली आहे. तर, मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 5 लाख 05 हजार 982 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 11,964 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या आता 85 हजार 327 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रानंतर दिल्ली, बिहार आणि मध्य प्रदेशमध्येही कोरोनाचा जास्त प्रभाव पाहायला मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या