देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 48 टक्क्यांवर, मृत्यू दर जगात सर्वाधिक कमी

1014

देशात आतापर्यंत कोरोनाचे 95 हजार 527 रुग्ण बरे झालेत आहेत, तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 48 टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच हा दर दिवसागणिक वाढत असून देशात मृत्यूदरही कमी आहे.

कोरोना मृतांपैकी 73 रुग्णांना गंभीर आजार

कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले आहेत, त्यापैकी 73 टक्के रुग्णांना गंभीर आजार होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. देशात कोरोना मृत्यू दर हा 2.82 टक्के आहे, तर जगात हा दर 6.13 टक्के आहे.  

एक लाख लोकसंख्येमागे 0.41 टक्के मृत्यू

देशाची लोकसंख्या ही जगातील 14 देशांइतकी आहे. त्या देशात 55.2 मृत्यू झाले आहे. परंतु हिंदुस्थानात प्रति लाख लोकसंख्येमागे मृत्यू दर हा 0.41 टक्के आहे. तर जगात हा देश 4.9 टक्के आहे. काही देशात हा आकडा 62 आणि 82 टक्क्यांवर पोहोचला आहे.  

तर कोविड केअर सेंटर तयार करू शकतात

देशात दररोज 1.20 लाख कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. सध्या 476 सरकारी आणि 205 खासगी लॅबमध्ये चाचण्यात होत आहेत. जर राज्यांना वाटत असेल तरे ते कोविड सेंटर तयार करू शकतात केंद्राने तशी परवानगी दिली असल्याचे आरोग्य विभागाने दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या