कोरोनाच्या फटक्याने लंडनमधील 500 वर्षे जुने दुकान होणार बंद

कोविड-19 च्या लॉकडाऊनने गेल्या 500 वर्षांहून जास्त काळ व्यवसाय करणारे लंडनमधील सर्वात जुन्या दुकानांपैकी एक आर्थर बिल जूनमध्ये बंद केले जाणार आहे. हे दुकान 16 व्या शतकात दोरखंड बनवणाऱ्या लॉन बार्ंमगहॅमने सुरू केले होते. याचे मूळ नाव ‘जॉन बार्ंमगहॅम हेम्प ऍण्ड फ्लेक्स ड्रेसर, टू-डीलर अॅण्ड रोप मेकर’ होते. हे 1843 मध्ये सध्याच्या ठिकाणी शिफ्ट झाले. काहींच्या मते, जॉन बार्ंमगहॅमने कंपनी याच्याही आधी 1500 च्या दशकात सुरू केली. येथे क्लाइंबिंग रोपशिवाय सागरी उपकरण आणि गिर्यारोहणाची सामग्री मिळत होती. संचालकांच्या म्हणण्यानुसार, महामारीमुळे त्यांची आर्थिक स्थिती वाईट झाल्याने ते आता दुकान चालवू शकत नाहीत. 1791 मध्ये उघडलेले हे सागरी उपकरणांचे दुकान 1843 मध्ये सध्याच्या ठिकाणी शिफ्ट झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या