सामाजिक बांधिलकीचा आदर्श! कोरोना रुग्णांसाठी मशिदीत बनवले कोविड सेंटर

फोटो - प्रातिनिधिक

कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना रुग्णालयात बेड्स उपलब्ध होत नाहीत. बेड्स मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. अनेकांना वेळेत उपचार मिळत नसल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यूही होत आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे रुग्णालयात बेड्स उपलब्ध नसणे आणि त्यामुळे होणारे रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी वडोदरातील एका मशीदीने सामाजिक बांधिलकी जपत मशीदीतच कोविंड सेंटर बनवले आहे.

मशीदीने केलेल्या या अनोख्या मदतीने रुग्णालयात जागा न मिळालेल्या रुग्णांवर मशीदीतील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मशीदीने समाजासमोर या कार्यातून आदर्श ठेवला आहे. मशीदीने घेतलेल्या या निर्णयाचे देशभरातून कौतुक होत आहे.

गुजरातमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयांवर ताण वाढत आहे. बेड्सची कमतरता आणि सुविधांचा अभाव यामुळे अनेक रुग्ण दगावत आहेत. रुग्णालयात जागाच नसल्याने रुग्णांवर उपचार  कसे करायचे, असा प्रश्न अनेकांपुढे उभा आहे.

या मोठ्या समस्येवर वडोदरातील जहांगीपुरा मशिदीने मार्ग शोधला आहे. ही समस्या लक्षात घेता मशीदीत कोरोना सेंटर उभआरण्याचा निर्णय मशीदीतील विश्वस्तांनी घेतला. त्यानुसार मशिदीत 50 पेक्षा अधिक बेड असलेले कोरोना सेंटर बनवण्मयात आले आहे. रुग्णालयात जागा न मिळालेल्या रुग्णांवर या मशीदीतील कोरोना सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

मशिदीच्या विश्वस्तांनी याबाबत सांगितले की, ‘ रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. या महामारीमुळे अनेक रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी बेड मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णाची समस्या लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मशीदीत आता प्राथनेसह रुग्णसेवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मशीदीच्या या निर्णयाने समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या