कोरोनाच्या लढाईसाठी ‘बीसीसीआय’ने शंभर कोटी निधी द्यायला हवा

कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे हिंदुस्थानच्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. ‘आयपीएल’ बायो-बबलमध्ये कोरोना शिरल्याने ही टी-20 क्रिकेट स्पर्धाही अर्ध्यावर बंद करावी लागली. मात्र या संकटाच्या काळात ‘बीसीसीआय’ व ‘आयपीएल’ यांनी मिळून देशाला कोरोनाच्या लढाईसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी द्यायला हवा, असे स्पष्ट मत हिंदुस्थानचे माजी यष्टिरक्षक व आयपीएल गव्हर्निंग काैन्सिलचे माजी सदस्य सुरिंदर खन्ना यांनी व्यक्त केले.

सुरिंदर खन्ना गतवर्षी आयपीएलच्या गव्हर्निंग काैन्सिलचे सदस्य होते. कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीची ‘आयपीएल’ ही यूएईमध्ये आयोजित करण्यात आली होती. या वेळी कोरोनाच्या संकटातही ‘बीसीसीआय’ने मायदेशात ‘आयपीएल’च्या 14व्या सत्राचे आयोजन करण्याचे धाडस केले होते. मात्र अनेक खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि ग्राऊंडमन यांना कोरोनाची लागण झाल्याने चार आठवडय़ांनंतर ही स्पर्धा बंद करावी लागली. आयपीएलची उर्वरित स्पर्धा झाली नाही तर ‘बीसीसीआय’ला दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. मात्र तरीही देशावर कोरोना महामारीचे संकट असताना ‘बीसीसीआय’ व आयपीएल यांनी नैतिक जबाबदारी ओळखून मदतीचा हात पुढे करायला हवा. ‘बीसीसीआय’कडील गंगाजळी बघता त्यांना देशासाठी आपली तिजोरी थोडी खाली करणे सहज शक्य आहे. त्यांची ती सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

मल्लखांबला प्राधान्य

अरविंद प्रभू यांनी पुढे नमूद केले की, मल्लखांब या खेळामुळे मज्जासंस्था, लवचिकता व स्नायूंची बळकटी वाढते. मल्लखांबामुळे एकाग्रताही वाढते. यामुळे मल्लखांबाला चांगला दर्जा मिळायला हवा यासाठी आई पुष्पा प्रभू यांनी महापौर व इतर स्पर्धांसाठी पुढाकार घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या