केंद्र सरकार राज्यांना 6177 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवणार

देशात ऑक्सिजनअभावी कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकारने मदतीचा हात सैल केला आहे. राज्यांना 6177 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी रविवारी ही माहिती दिली.

महाराष्ट्राला 1500 मेट्रिक टन दिल्लीला 350, उत्तर प्रदेशला 800 मेट्रिक टन ऑक्सिजनचे वितरण 20 एप्रिलनंतर होणार आहे. त्याचबरोबर नऊ क्षेत्रे वगळता इतर उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा काही काळासाठी बंद केला आहे. 22 एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार आहे.

राज्यांनी मागणीवर नियंत्रण ठेवावे – गोयल

गोयल यांनी केंद्राचा निर्णय जाहीर करतानाच राज्यांच्या जबाबदारीवर बोट ठेवले. राज्य सरकारांनी ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवावी. मागणी व्यवस्थापन हे पुरवठा व्यवस्थापनाइतकेच महत्त्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणे ही राज्यांची जबाबदारी आहे. राज्यांनी ही जबाबदारी पूर्णपणे निभावली पाहिजे, असा डोस गोयल यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या