कोरोनाचे संकट आणखी गंभीर होत जाईल; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

1263
who

आरोग्यासाठी आवश्यक बाबींची काळजी सर्व देशांनी घेतली नाही तर कोरोनाचा प्रकोप आणखी गंभीर होत जाईल आणि पुढील बराच काळ आपली त्यातून सुटका होणार नाही असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रिएसस यांनी कोरोनाच्या सद्य परिस्थितीबाबत जिनिक्हा येथील मुख्यालयात माहिती दिली. कोरोना नियंत्रणाच्या बाबतीत जगातील अनेक देश विशेषत: युरोप आणि आशिया खंडातील देश चुकीच्या पध्दतीने जात आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये घ्यावी लागणारी काळजी अनेक ठिकाणी घेतली जात नाही आणि अनेक देशांमधील नेते कोरोनासंदर्भात वेगवेगळी वक्तव्ये करत असल्याने नागरिकही संभ्रमात आहेत असे टेड्रोस यांनी सांगितले. जगातील 1 कोटी 30 लाख लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये त्यात दहा लाख रुग्णांची भर पडली. अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या