रिलीजचा धडाका! बॉलीवूड फ्रंटफूटवर; ‘सूर्यवंशी’ दिवाळीला तर ‘83’ ख्रिसमसला येणार

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने महाराष्ट्र आता अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहे. येत्या 22 ऑक्टोबरपासून थिएटर, नाटय़गृहे सुरू होणार असल्याने निर्मात्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बॉलीवूड निर्मात्यांनी आता चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करण्याचा धडाकाच लावला आहे. येत्या काही महिन्यांत सुमारे बिग बजेट चित्रपटांच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर 1500 ते 2 हजार कोटी रुपयांची उलाढाल होईल.

महाराष्ट्र हे व्यवसायाचे मुख्य केंद्र असल्याने महाराष्ट्रात थिएटर पुन्हा कधी सुरू होणार याची निर्माते वाट बघत होते. अखेर शनिवारी याबाबत घोषणा होताच जवळपास 20 चित्रपटांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ‘सूर्यवंशी’ आणि ‘83’ हे दोन्ही चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होतील, असा शब्द निर्मात्यांनी गेल्या वर्षी थिएटर मालकांना दिला होता. त्याप्रमाणे अक्षयचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीला तर रणवीर सिंगचा ‘83’ ख्रिसमसला थिएटरमध्येच प्रदर्शित होणार आहे. आमीरचा ‘लाल सिंह चड्ढा’ मात्र ख्रिसमसऐवजी व्हॅलेंटाइन डेला प्रदर्शित होतोय.

या वर्षी प्रदर्शित होणारे चित्रपट

सूर्यवंशी – दिवाळी, 83 – ख्रिसमस, भवाई – 22 ऑक्टोबर, बंटी और बबली 2 – 19 नोव्हेंबर, सत्यमेव जयते 2 – 26 नोव्हेंबर, तडप – 3 डिसेंबर, चंदीगढ करे आशिकी – 10 डिसेंबर, जर्सी – 31 डिसेंबर.

2022ला प्रदर्शित होणारे चित्रपट

राधेश्याम – 14 जाने., पृथ्वीराज – 21 जाने., लाल सिंह चड्ढा – व्हॅलेंटाईन डे, जयेशभाई जोरदार – 25 फेब्रु., बच्चन पांडे – 4 मार्च, शमशेरा – 18 मार्च, केजीएफ 2 – 14 एप्रिल, मेडे – 29 एप्रिल, भुलभुलैया 2 – 25 मार्च, हिरोपंती 2 – 6 मे, आदिपुरुष, रक्षाबंधन – 11 ऑगस्ट, रामसेतू – दिवाळी, गणपत – 23 डिसेंबर .

मराठीचे ‘वेट अँड वॉच’

मराठी चित्रपट निर्मात्यांनी मात्र प्रदर्शनाच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत. ‘डार्ंलग’, ‘टकाटक 2’, ‘हॅशटॅग प्रेम’, ‘एक नंबर एकदम कडक’सारख्या चित्रपटांचे पोस्ट प्रॉडक्शन पूर्ण झाले असून लवकरच प्रदर्शनाच्या तारखा जाहीर होतील.

आपली प्रतिक्रिया द्या