#CoronaCrisis – सॅमसंग हिंदुस्थानला देणार 37 कोटींची मदत

देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाची प्रकरणे समोर येत आहे. याच दरम्यान अनेक राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशातच आता हिंदुस्थानच्या मदतीला टेक कंपनी ‘सॅमसंग’ने पुढाकार घेतला आहे.

सॅमसंगच्या म्हणण्यानुसार कंपनी हिंदुस्थानला कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी 37 कोटी रुपयांची मदत करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, हा निधी केंद्र व राज्य सरकारांना देण्यात येणार आहे. जेणेकरुन आरोग्य सेवा क्षेत्रात आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन देण्यात येतील. सॅमसंगने म्हटले आहे की, हिंदुस्थानातील अनेक स्टेक होल्डर्सशी चर्चा केल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सॅमसंगने कोरोनाशी लढण्यासाठी 20 कोटी रूपयांची मदत दिली होती. यामध्ये केंद्र सरकारसह नोएडा स्थानिक प्रशासनाचा समावेश होता. जिथे कंपनीने पीपीई किट आणि मास्क दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या