तेलंगणात बुधवारपासून 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर

तेलंगणामध्ये कोरोनाचे वाढते प्रकरण पाहता बुधवारपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन दरम्यान सकाळी 6 ते 10 या वेळेत सर्व कामांना सूट देण्यात आली आहे. या बैठकीत कोरोनाची लस खरेदी करण्यासाठी जागतिक निविदा मागविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

तेलंगणाम कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे, हे रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचे 4823 नवीन रुग्ण आढळले आणि 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात कोरोनाची जवळपास 63 हजार सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे.

तेलंगणामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 2700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णाचा रिकव्हरी रेट 86.94 टक्के आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशमध्येही कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सोमवारी आंध्र प्रदेशात ऑक्सिजनच्या अभावामुळे 11 रुग्णांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या