#Coronaचा परिणाम, यापुढे चीनमध्ये खाल्ले जाणार नाहीत ‘हे’ प्राणी

2972
प्रातिनिधीक फोटो

कोरोना या भयंकर विषाणूमुळे चीनमध्ये हाहाकार माजला आहे. मृतांचा आकडा जवळपास 2788 इतका पोहोचला आहे. तर गुरुवारपर्यंत कोरोनाचे 327 नवीन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये काही प्राणी खाण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरससंबंधी प्राथमिक माहिती मिळाली तेव्हा चीनमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत होता. या व्हिडीओत एक तरुणी वटवाघूळ खाताना दिसत होती. या तरुणीमुळेच कोरोना व्हायरस पसरला असल्याचा दावा या व्हिडीओतून करण्यात आला होता. तिथून कोरोनाचं थैमान सुरू झाल्याचा दावा करण्यात आला होता. अर्थात या दाव्यात सत्यता किती हे कळलं नसलं तरी आता चीनमध्ये काही प्रांतात विशिष्ट प्राणी खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

चीनच्या शेन्झेन प्रांतात कुत्रे आणि मांजर खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच आता यापुढे कुत्रे आणि मांजरी फक्त पाळीव जनावरं असणार आहेत. त्यांचं मांस शिजवणं, विकणं किंवा सेवन करणं यापुढे निषिद्ध असणार आहे. यापुढे शेन्झेन प्रांतात फक्त पोर्क, चिकन, बीफ, ससा, मासे आणि अन्य समुद्री जीव याच मांस प्रकारांना परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना सध्या संपूर्ण जगात दहशत माजवताना दिसत आहे. आरोग्यापासून ते दोन देशांमधील परस्पर संबंधांपर्यंत तसंच अन्नापासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत सर्वकाही कोरोनाच्या दहशतीखाली आलं आहे. चीनमध्ये पसरलेल्या या विषाणुमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या