World News Photo – जगभरातील काही महत्वाच्या बातम्या वाचा फक्त 8 सेकंदात

904

1 ) इंग्लंडमधील बोर्नमाऊथ समुद्रकिनारी तोबा गर्दी
इंग्लंडमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने तिथे चिंता वाढत चालली आहे. मात्र बेफिकीर लोकांना उकाडा असह्य व्हायला लागल्याने त्यांनी बोर्नमाऊथ समुद्रकिनाऱ्यावर तोबा गर्दी केली होती. इथलं तापमान 30 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचलं असल्याने तिथल्या लोकांना ते सहन होत नाहीये

bournemouth-england-seashore

2) बीजिंगमध्ये थिएटर्स पुन्हा गजबजली
चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमध्ये सिनेमा थिएटर्स पुन्हा सुरू झाली आहेत. इथे प्रेक्षकांना सोशल डिस्टन्सिंग पाळून थिएटरमध्ये प्रवेश दिला जात आहे. जीवघेण्या कोरोना आजाराचा प्रसार याच चीनपासून सुरू झाला होता. एकीकडे जग या आजाराशी झुंजत असताना दुसरीकडे चीनमधील परिस्थिती आता सामान्य व्हायला लागली आहे.

theaters-open-in-china-bijieng

3) झिम्बाब्वेच्या केंद्रीय कृषीमंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
झिम्बाब्वेचे केंद्रीय कृषीमंत्री पेरेन्स शिरी यांचा 65 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे ते दगावल्याचे सांगण्यात आले आहे. 1982-1985 दरम्यान 20 हजार लोकांची माताबेललँडमध्ये कत्तल करण्यात आली होती. या नरसंहारामध्ये शिरी यांचाही सहभाग असल्याचा आरोप करत त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती.

perence-shiri-zimbabwe-minister-death

4 ) ब्लॅक लिव्ह मॅटर, ट्रंप टॉवरसमोर निदर्शने
जॉर्ज फ्लॉईड नावाच्या व्यक्तीचा पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेत असताना मृत्यू झाला. यानंतर अमेरिकेत ट्रंप प्रशासनाविरोधात आंदोलने सुरू झाली आहेत. न्यूयॉर्कमध्ये ट्रंप टॉवरसमोर निदर्शने करण्यात आली. त्यापूर्वी एक मोर्चा काढण्यात आला होता.

black-lives-matter-new-portest

5) वाळवंटातील चित्ता
नामिबियामध्ये वर्ल्ड रेंजर डे निमित्त आयोजित स्पर्धेची माहिती देत असताना हा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. नामिबयातील नामिबच्या वाळवंटातील चित्त्याचे टीपलेले हे छायाचित्र अनेकांच्या पसंतीस पडले आहे.

namibia-desert-cheetah

आपली प्रतिक्रिया द्या