कवठे येमाईत पुन्हा कोरोनाचा शिरकाव; एकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

494

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला उपचारासाठी शिरूरला दाखल करण्यात आले आहे. तर त्या रुग्णाच्या नजीकच्या संपर्कात आलेले 11 व लोरीस्क संपर्कांतील 13 अशा एकूण 24 जणांना क्वॉरंटाईन करण्यात येत असल्याची माहिती कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कट्टीमणी यांनी दिली.

लोकसंख्येच्या दृष्टीने शिरूरच्या पश्चिम भागातील मोठे गाव असलेल्या कवठे येमाईत आतापर्यंत 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता गावठाणात नव्याने पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना स्वॅब टेस्टसाठी मलठण कोविड सेंटरला पाठविण्यात आले असून लोरिस्क संपर्कांतील 13 जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात येत असल्याची माहिती डॉ.कट्टीमनी यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सॅनेटाईझरचा वापर करावा, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावेत, संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून नाक व तोंडावर मास्क,रुमाल यांचा वापर करावा असे आवाहन डॉ.कट्टीमनी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या