कोरोनाच्या भयाने कोरियात अब्जावधी डॉलर जळाले

चलनी नोटांनीही कोरोनाचा संसर्ग होतो या भीतीने दक्षिण कोरियातील नागरिकांकडून डॉलरचे ओव्हनमध्ये सॅनिटायजेशन करताना अब्जावधी डॉलर्स पूर्ण अथवा अंशतः जळाल्याचे उघड झाले आहे.

कोरियन नागरिकांनी आपल्याकडील डॉलरमधील चलन सॅनिटाईज करण्यासाठी ओव्हनमध्ये गरम करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या प्रयत्नात अब्जावधी डॉलर जळाल्याचे वृत्त आहे. त्यांनी या डॉलरच्या नोटा आधी मशीनमध्ये धुतल्या आणि नंतर त्या गरम करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवल्या होत्या. मात्र कोरोना विषाणूला नष्ट करण्याच्या प्रयत्नात या नागरिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या