दारूवर 5मे पासून 70 टक्के ‘कोरोना शुल्क’ आकारणार, केजरीवाल सरकारचा निर्णय

2122

दिल्लीमध्ये मंगळवारपासून म्हणजेच 5 मे पासून दारू भयंकर महाग होणार आहे. तिथल्या केजरीवाल सरकारने दारूवर 70 टक्के विशेष कोरोना शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीप्रमाणेच हरयाणामध्येही Covid-19 अधिभार लागू करण्यात आला आहे. त्यामुळे तिथेही दारू महाग झाली आहे.


सोमवारी देशातील लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोनाला आळा बसावा, त्याचा फैलाव रोखता यावा यासाठी 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. पहिल्या दोन लॉकडाऊनमध्ये ज्या सवलती मिळाल्या नव्हत्या त्या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये देण्यात आल्या आहेत. यामध्ये दारूच्या विक्रीला परवानगीचाही समावेश आहे.


दारूची दुकाने सुरू होणार हे कळताच दारूसाठी आसुलेल्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सोमवारी दारूसाठी लांबचलांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. अनेक ठिकाणी इतकी गर्दी झाली की पोलिसांना दुकाने बंद करावी लागली होती. या गर्दीमुळे दोन व्यक्तींमध्ये जे अंतर राखणं गरजेचं होतं, त्याचा पुरता बोजवारा उडालेला पाहायला मिळाला.

आपली प्रतिक्रिया द्या