अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक वर्षे लागणार! रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली तीव्र चिंता

957
rbi-1

‘कोरोना’ लॉकडाऊनमुळे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त पोखरली गेली आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक वर्षे लागतील, अशी तीव्र चिंता रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या (एमपीसी) बैठकीतील मिनिट्सनुसार (इतिवृत्त) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

काय आहे आर्थिक स्थिती?
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन केल्याने सर्व उद्योग, व्यवसाय, व्यापार बंद झाले.  मागणी नसल्यामुळे उत्पादन ठप्प झाले. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. सर्व व्यवहारच ठप्प झाले.

जीडीपीने 2019-20 मध्ये अकरा वर्षांतील निच्चांकी स्तर गाठला आहे. जीडीपी 4.2 टक्के होता. चालू आर्थिक वर्षांत 2020-21 मध्ये जीडीपी आणखी खाली येईल.

लॉकडाऊनचा फटका अर्थव्यवस्थेला बसेल असा अंदाज होता; पण अपेक्षेपेक्षा जास्त फटका बसला आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बरेच वर्षे जावे लागतील.

केवळ कृषीक्षेत्र तेजीत
लॉकडाऊन काळात देशात केवळ कृषीक्षेत्रात तेजीत आहे. मागणी आणि पुरवठा येथे व्यवस्थीत होत आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस चांगला होईल, असा अंदाज असून, शेतीसाठी दिलासादायक आहे. इतर सर्व क्षेत्रात लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या