कोरोना व्हायरस बायकोसारखा, इंडोनेशियन मंत्र्याचे वादग्रस्त व्यक्तव्य

619

इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री मोहम्मद महफूद यांनी कोरोनाची तुलना बायकोशी केली आहे. त्यामुळे इंडोनेशियात वाद निर्माण झाला असून अनेक महिला संघटनांनी नाराजी दर्शवली आहे. तसेच मंत्री महफूद यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

मंत्री मोहम्मद महफूद एका कार्यक्रमात म्हणाले की, “मला माझ्या सहकार्या ने एक मीम पाठवला. त्यात ते म्हटलं होतं की कोरोना व्हायरस हा आपल्या बायकोसारखा आहे. ज्यावर तुम्ही नियंत्रण मिळवू पाहता. परंतु जेव्हा तुम्हाला कळंत की ते शक्य नाही तेव्हा तुम्ही त्यासोबत जगणे शिकून जाता.

त्यांच्या या वक्तव्यामुळे इंडोनेशियामध्ये एकच वाद निर्माण झाला आहे. महिला संघटनांनी महफूद यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणी मंत्री महफूद यांनी कुठलीच प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. इंडोनेशियात २४ हजार पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत, तसेच आतापर्यंत 1496 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या