कोरोनने बेकार केले, लॉटरीने मात्र तारले

339

कोरोना महामारीमुळे इंग्लंडच्या नॉटिंगहॅम शहरात साउंड इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या शिबू पॉल या हिंदुस्थानी नागरिकाची नोकरी गेली.पण या बेकार युवकाला इंग्लंडमधील एका लॉटरीने मोठा हात दिला. निराश झालेल्या शिबूने लॉटरीची 1800 रुपयांची तिकिटे खरेदी केली होती.या लॉटरीतून शिबुला कोटय़वधींची महागडी लॅम्बोर्गिनी कार आणि 18 लाख रुपयांचे रोख बक्षीस लागले आहे. केरळमधील कोचीत ध्वनी अभियंता म्हणून काम करणाऱ्या शिबुला कोरोनाने बेरोजगार केले, पण लॉटरीने त्याच्यावर पैशांची उधळण करीत त्याला लक्षाधीश केले. एक मार्ग बंद झाला की परमेश्वर दुसरा मार्ग उघडतो याचाच प्रत्यय आपल्याला आला असे शिबू सर्वांना सांगत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या