कोरोनामुळे यंदाचा ‘जनस्थान’ पुरस्कार सोहळा स्थगित, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा निर्णय

वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी आयोजित केलेला जनस्थान पुरस्कार समारंभ स्थगित केला आहे.

या पुरस्कार समारंभाचे आयोजन बुधवार दि. 10 मार्च रोजी सायं. 6.30 वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले होते. एक वर्षाआड दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा ‘जनस्थान पुरस्कार’ म्हणजे साहित्य क्षेत्रात असामान्य कामगिरी करून हिंदुस्थानी समाजाचे साहित्य जीवन समृद्ध करणाऱ्या महनीय व्यक्तींना प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञतेचा नमस्कार असतो. यंदा हा पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल जाहीर करण्यात आला आहे.

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या