Corona management – इथे भरतो फिरता बाजार, भाज्याही मिळतात योग्य दरात

899

कोरोनाला आळा बसण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. असे असले तरी लोक भाजीपाला घेण्यासाठी बाजारामध्ये मोठी गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विविध राज्यात अनेक ठिकाणी
विविध युक्त्या लढवून यावर नियंत्रण मिळवले जात आहे.

चंदिगड येथे प्रशासनाने अशीच एक युक्ती केली आहे. इथे प्रशासनाकडून फिरता भाजी बाजार प्रत्यक्षात आणली आहे. चंदिगड सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बस मध्ये भाज्या, फळे यांच्या टोपल्या ठेवल्या जातात. त्यानंतर बस विविध सेक्टर मध्ये उभी करून तेथील नागरिकांना भाजी उपलब्ध करून दिली जात आहे.

असे केल्याने भाजीपाला जादा दराने विक्री करण्यास आपोआपच आळा बसतो आणि गर्दी न करता सर्वांना भाजीपाला उपलब्ध होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या