बुलढाण्यात 13 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह

corona-new

कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी बुलढाणामध्ये शनिवारी 13 अहवाल मिळाले आहेत. सर्व 13 अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत 874 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर जिल्ह्यात एकूण 36 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तिघांचान मृ्त्यू झाला आहे. मलकापूर पांग्रा (ता. सिंदखेड राजा) येथील 8 वर्षांच्या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 25 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 25 आहे. सध्या रूग्णालयात 08 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच शनिवारी 13 अहवाल मिळाले आहेत. ते सर्व 13 अहवाल निगेटिव्ह आहेत. तसेच अजून 133 अहवालांची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत एकूण 874 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या