वसई-विरारमध्ये करोनाबाधीत रुग्णांची संख्या 36 वर; तिघांचा मृत्यू

722

वसई विरार शहरातील करोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत शनिवारी चार रूग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत पालिका क्षेत्रात 36 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून चार जणांचा मृत्यू झालेला आहे. शनिवारी वसई पश्चिमेकडील 25 वर्षांचा मुलगा, विरार पश्चिमेकडील 42 वर्षांचा पुरुष , 54 वर्षांची महिला, 35 वर्षांची महिला नर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. दुपारी 12 वाजेपर्यंत 4 नवीन रुग्णांची वाढ झाल्याची माहिती मिळाली होती.

वसई पश्चिमेकडिल 25 वर्षांच्या कोरोनाबाधीत मूलाच्या वडिलांचा कोरोनामुळे 5 एप्रिलला मृत्यू झाला होता. त्या मुलाच्या 52 वर्षांच्या आईलाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल 10 एप्रिलला पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आई व मुलगा दोघांना आता ठाणे हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्याचप्रमाणे विरार पश्चिमेकडील 42 वर्षांच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. हा रुग्ण मुंबई सांताक्रुझ येथे स्टॉक ब्रोकींग कंपनीत नोकरीला आहे. 30 एप्रिल ते 2 एप्रिलपर्यंत तो मुंबई स्टॉक ब्रोकिंग ऑफिसमध्ये कार्यरत होता. 3 एप्रिलला तो घरी परत आल्यानंतर 5 एप्रिलला त्याला ताप आला होता. त्यांच्या कार्यालयातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर त्यांनी 9 एप्रिलला कोविड टेस्ट केली. त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्टॉ झाले. त्यांच्या घरातील त्यांची आई (वय 73) , वडील (वय 75) , पत्नी (वय 38), मुलगी (वय 9) यांना वसई पूर्वेच्या महापालिकेच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे. तसेच रुग्णावर नालासोपारा पश्चिमेकडिल हॉस्पीटल मध्ये उपचार सुरु आहेत.

विरार येथे सापडलेला तिसरा रूग्ण 35 वर्षांची महिला असून विरार पश्चिमेकडे राहणारी आहे. ही महिला नर्स असून त्या कांदिवलीच्या कोविड वॉर्डमध्ये कार्यरत होत्या. त्यांना कोविडची लक्षणे जाणवत असल्याने 9 एप्रिल रोजी त्यांनी आपली कोविड टेस्ट केली, 10 एप्रिल रोजी त्या कोविड पॉझिटीव्ह आहे हे सिद्ध झाले. त्याच्या घरात महिलेचे पती (वय 35), सासू (वय 61), मुलगा (वय 4), मुलगी (वय 8) सध्या होमक्वारंटाईन आहेत. रुग्ण नर्सवर कांदिवली महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विरार पश्चिम येथे शनिवारी सापडलेला चौथा रूग्णदेखील महिला असून ती 54 वर्षीय आहे. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहे. याआधी तिचा पती व मुलगा यांना कोरोनाची लागण झाली आहे. पती व मुलगा हे कोरोना विषाणू बाधीत झाल्यानंतर ह्या महिलेस महापालिकेने क्वारंटाईन केले होते. महिलेला ठाणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या