पुण्यात कोरोना बाधित मृत्यूंचा आकडा पाचवर, चोवीस तासात तीन बळी

665

पुणे शहरात कोरोनाची बाधा झालेल्या तीन रुग्णांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. यामध्ये एका 60 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा तर 48 वर्षांच्या व्यक्तिचा समावेश आहे. पुरुषाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यांना करोनाची बाधा झाल्याचे अहवाल रात्री उशिरा आले होते. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर रविवारी सकाळी औंध रुग्णालयात एका 69 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

यातील पहिला रुग्ण असलेली ही 60 वर्षांची महिला काही दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात उपचारांसाठी आली होती. तिची चाचणी घेतली असता तो अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला नायडू रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने तिला काल ससूनला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिला मृत्यू आला. दरम्यान, तिचा स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल प्राप्त झाला असून तिला करोनाची लागण झाल्याचे या अहवालात निष्पन्न झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

यातील तिसऱ्या महिला रुग्णाला पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे गुलटेकडी येथील अडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये 30 मार्च रोजी ऍडमिट करण्यात आले होते. त्याच रात्री तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. परंतु या रुग्णालयात उपचार न करता तिला औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या