
चीनमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून जून अखेरीपर्यंत मोठी लाट येणार आहे. या लाटेत दर आठवडय़ाला कोरोनाचे 6.5 कोटीहून जास्त रुग्ण सापडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा उपप्रकार एक्सबीबी यामुळे ही लाट येण्याची शक्यता चिनी विज्ञान परिषदेतील एका तज्ञाने व्यक्त केली आहे. दरम्यान, नवीन लाट मागील लाटेपेक्षा अधिक धोकादायक असेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.