राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सवा लाख पार, 93 हजार 652 रुग्णांवर उपचार

521

राज्यात गेल्या नऊ दिवसांत 34 हजार 105 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.19 टक्के असून आज कोरोनाच्या 4067 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यत एकूण संख्या 1 लाख 27 हजार 259 झाली आहे. कोरोनाच्या 6875 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 93 हजार 652 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात आज 219 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 4.19 टक्के एवढा आहे. 219 मृत्यूंमध्ये मुंबई मनपा-68, ठाणे-8, ठाणे मनपा-20, नवी मुंबई मनपा-5, कल्याण-डोंबिवली मनपा-18, उल्हासनगर मनपा-3, भिवंडी-निजापूर मनपा-9, मीरा-भाईंदर मनपा-3, पालघर-1, वसई-विरार मनपा-7, रायगड-9, पनवेल मनपा-8, नाशिक-3, नाशिक मनपा-1, नगर-1, नगर मनपा-1, जळगाव-6, जळगाव मनपा-1, नंदूरबार-2, पुणे-2, पुणे मनपा-18, पिंपरी-चिंचवड मनपा-7, सोलापूर-4, सोलापूर मनपा-4, सातारा-3, जालना-1, लातूर मनपा-1,नांदेड-1, अमरावती-1, नागपूर-1, नागपूर मनपा-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील 1 अशी नोंद आहे.

मुंबईत 1,282 नवे रुग्ण, 68 जणांचा मृत्यू, एका दिवसात 513 कोरोनामुक्त
मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 1,282 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 68 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 513 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 59 हजार 751 वर पोहोचली आहे.

मुंबईतील गेल्या 48 तासांत 68 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 129 झाली आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 23 हजार 915 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची लागण होण्याचा डबलिंग रेट आता 47 दिवसांवर आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या