मुंबई-रत्नागिरी ते कोल्हापूर प्रवास करणारी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

1702

मुंबईतून रत्नागिरीत आणि रत्नागिरीतून कोल्हापूर असा प्रवास करणारा एकजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले आहे. ही व्यक्ती मुंबईतून अनेक वाहने बदलत रत्नागिरीपर्यंत पोहचली होती. त्यानंतर पाईपची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने तो कोल्हापूरला जात होता. त्यावेळी बांबुर्डे येथे शाहूवाडी पोलिसांनी त्याला पकडले. त्याला कोल्हापूरात नेऊन त्याचा स्वॅब तपासण्यात आला असता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या