कोरोनावरून एप्रिल फुल करणार, तर गुन्हे दाखल होणार

991

राज्यात सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सोशल मिडीयाद्वारे 1 एप्रिल रोजी कोरोना संदर्भात एप्रिल फुल करण्याच्या उद्देशाने संदेश पाठवले पाठवले तर संबंधितावर आणि ग्रुप अॅडमीनवर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी सांगितले.

सोशल मीडियाद्वारे मित्र, नातेवाईकांना ‘एप्रिल फुल’ चा आनंद घेण्यासाठी संदेश पाठवत असतात. सध्या कोरोनामुळे संचारबंदी लागू केली आहे. कोरोना संदर्भात विशिष्ट मेसेज पाठवून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करून पोलीस प्रशासनावरील ताण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संदेश पाठवणारे व ग्रुप अॅडमीनला पोलीस नियम 68 प्रमाणे नोटीस बजावण्यात येत असून एप्रिल फुल करण्यासंदर्भातील मेसेज व संदेश आढळून आल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा नियम 140 व भारतीय दंड संहिता 188 कलमाद्वारे संदेश व्हायरल करणाऱ्यासह ग्रुप अॅडमीनवर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या