पुणे पोलिसांकडून नागरिक आणि दुकानदार यांच्यात सोशल डिसटन्स

518
pune-police

शहरात संचारबंदीत अत्यावश्यक वस्तू घेण्याच्या बहाण्याने नागरिक बाहेर निघत असून अनेक ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी पुणे पोलीस आणि लोकीव्ह इनिशिटीव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा प्लस डुइंग मोर उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याद्वारे नागरिकांना परिसरातील दुकानादारांकडून किराणा साहित्य भरल्यानंतर फोन कॉल करून माहिती दिली जाणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तू आणि दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आलेली आहेत. असे असतानाही अनेकजण भाजीपाला व मेडिकल आणि किराणा दुकान साहित्य घेण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे दुकानाबाहेर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे गर्दी कमी कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर आता पोलिसांनी तोडगा काढला आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यकंटेशम व अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या संकल्पनेतून सेवा प्लस डुइंग मोर उपक्रम सुरू केला आहे. लोकीव्ह इनिशिटीव्ह या संस्थेने व पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

नागरिकांना यासाठी www.lociv.com ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागरिकांनी या वेबसाईटवर गेल्यानंतर त्यांना त्यांच्या परिसरातील दोन किलोमीटरच्या अंतरात असणारे अत्यावश्यक दुकाने दिसतील. ग्रीन स्टार्सने दाखविलेल्या दुकानावर क्लिक केल्यानंतर तुम्ही वस्तू मागणी करू शकता. त्यानंतर दुकानदार तुमच्या वस्तू काढून पॅकेट तयार करीत तुम्हाला फोन करून माहिती देणार आहे. त्यांनतर तुम्ही त्या वस्तू घेऊन येण्यासाठी दुकानात जायचे आहे. त्यामुळे घराबाहेर जास्त वेळ नागरीकाना थांबावे लागणार नाही. तसेच गर्दी देखील होणार नाही, असे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाची व्यप्ती वाढली तर शहरातील आणखी काही भाग सील केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या