कोरोनावर येतेय सुपरव्हॅक्सिन; ना व्हेरिएंटची झंझट, ना महामारीचा धोका

कोरोना संकटात जगभरातील विविध देशांत आढळणाऱया कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे डोकेदुखी वाढत आहे. कोरोना महामारीचा दिवसेंदिवस वाढत जाणारा धोका कसा कमी करायचा याची चिंता अनेक देशांना लागली आहे. या सर्वांवर जालीम उपाय म्हणून ‘सुपरव्हॅक्सिन’ तयार करण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांनी सुरू केला आहे.

अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी कोरोनाचे सर्व प्रकारचे व्हेरिएंट संपुष्टात येतील. तसेच भविष्यात कोणतीही महामारी आल्यास त्याच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासदेखील मदत होईल अशा प्रकारच्या लसीच्या निर्मितीवर संशोधन सुरू करण्यात आले आहे. वैज्ञानिकांकडून सध्या उंदरांवर या लसीची चाचणी केली जात आहे. कोरोना महामारीवर सध्या लस हे एकच प्रभावी अस्त्र्ा ठरताना दिसत आहे. भविष्यात आणखी कोणता विषाणू हाहाकार करेल काही सांगता येत नाही. त्यामुळे कोविड-19 सोबतच इतर सर्व प्रकारांवर प्रभावी ठरू शकेल अशा प्रकारच्या ‘सुपरव्हॅक्सिन’ची निर्मिती केली जात आहे. या लसीला ‘सेकंड जनरेशन’ असे संबोधण्यात येत आहे.

पुढील वर्षात मानवी चाचणीची शक्यता

सार्स आणि कोविड-19 या दोन व्हेरिएंटने गेल्या दोन दशकांमध्ये जगात हाहाकार उडवून दिला आहे. त्यामुळे सार्स आणि कोविड विषाणूने पीडित उंदरांवर लसीची चाचणी घेण्यात आली. यात उंदरांमध्ये अॅण्टीबॉडीज तयार होत असल्याचे दिसून येत आहे. यात स्पाइक प्रोटीनचा सामना करू शकेल अशा अॅण्टीबॉडीज तयार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील वर्षात याची मानवी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या