विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 80 आरोग्य सेवकांची कोरोना तपासणी

627

लातूरमध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील कोविड 19 रुग्णालयात सेवा देणाऱ्या 80 आरोग्य सेवकांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोविड 19 रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर, नर्सेस, मेडिक्स, पॅरामेडिक्स, इतर कर्मचारी, सफाई कर्मचारी या सर्वांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.

लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोविड 19 रुग्णालय असून याठिकाणी अशा रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करणारी प्रयोगशाळाही आहे. याठिकाणी लातूरसह धाराशीव, बीड येथील स्वॅब नमुने तपासणीसाठी येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार मागच्या दोन दिवसात कोविड 19 रुग्णालयात सेवा देणाऱ्या आणि प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांची तपासणी करून घेतली आहे. तपासणी केलेल्या 80 कर्मचाऱ्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सुरक्षेची काळजी घेऊन सर्व कर्मचारी योग्य पद्धतीने काम करीत असल्याबद्दल पालकमंत्री देशमुख यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या